संस्कृती प्रतिष्ठान ढोल – ताशा पथक फलटण तर्फे वारुगड येथे वृक्षारोपण व साफ सफाई करून जपली सामाजिक बांधिलकी

फलटण : संस्कृती प्रतिष्ठान ढोल- ताशा पथकाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही , सामाजिक व पर्यावरण पूरक असे कार्यक्रमांची परंपरा चालू ठेवली सामाजिक बांधिलकी जपली आहे, फलटण पासून जवळच असलेला वारुगड हा फक्त १६ किमी अंतरावर असल्याने गडावरती बरेच जण फिरण्यासाठी जातात आणि त्यामुळे लोकं तिथेच खाण्याचे पॅकेट , प्लास्टिक पिशव्या , पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकून देतात ,त्यामुळेकिल्ल्यावरती अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले होते .
 त्यामूळे या पथकाने तिथे साफसफाई करण्याचे काम हाथी घेतले , तसेच वारूगड येथे डोंगरावर नैसर्गिक संवर्धन करण्यासाठी संत तुकारामांच्या  वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे अभंगाचे बोल सार्थ ठरवत १०० झाडांच्या रोपांची लागवड करून पर्यावरणाला ही हातभार लावला . येणाऱ्या पुढील काळात ही फलटण परिसरामध्ये आणखी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे संस्कृती प्रतिष्ठान ढोल – ताशा पथकाने योजिले आहे .यावेळी ढोल पथकातील सर्वे सदस्य उपस्थित होते .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!