इंदापूर वार्ताहर:आज दिनांक 2 जुलै रोजी कुरवली येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त कृषी विभाग महाराष्ट्र राज्य व कृषी महाविद्यालय वैभववाडी च्या कृषीदूतांनकडून वृक्षारोपण समारंभ व लष्कर आळी नियंत्रण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी गावातील जेष्ठ नागरिकांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ पार पडला व गावातील शेतकर्यांना मका लष्कर आळी नियंत्रण व मका पिक आधुनिक उत्पादन पद्धत व उत्पन्न वाढ या संदर्भात मार्गदर्शक करण्यात आले. या प्रसंगी कुरवली गावचे सरपंच मा. श्री बापुराव भगवान पांढरे कृषी मंडल आधीकारी मा.श्री कुंडलिक माळवे साहेब ,कृषी पर्यवेक्षक मा.श्री चंद्रकांत सुतार साहेब, कृषी सहायक मा.श्री श्याम कांबळे साहेब ,कुरवली गावचे उपसरपंच मा.श्री सूरेश चव्हाण , आनंदराव माने, पांडुरंग कदम, रामचंद्र चव्हाण,योगेश माने,चंद्रकांत चव्हाण, किरण घोरपडे, प्रगतशील शेतकरी किशोर कदम व कृषी महाविद्यालय सांगुळवाडी ता. वैभववाडी जि. सिधुंदुर्ग चे कृषीदूत चि. सुरज भालचंद्र चव्हाण चि. रोनित रविंद्र कदम चि. जयदीप हरिदास घोगरे व कुरवली गावातील जेष्ठ नागरीक उपस्थित होते.