सांगवी (ता.फलटण)
येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह (१ ते ७ जुलै )निमित्ताने कृषी दिन व ऊस पिकाच्या शेतकऱ्यांच्या शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.आर.एम.गारकर(शास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव) उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला सांगवी गावच्या सरपंच मा.सौ. शर्मिलाताई सुरेश जगताप, श्रीराम सह.साखर कारखान्याचे संचालक मा.पोपटराव जाधव, मंडळ कृषि अधिकारी विडणी,श्री.अमोल सपकाळ, कृषि पर्यवेक्षक श्री.राजेंद्र पालवे, कृषी सहायक श्री. योगेश भोंगळे, श्री.सागर पवार, श्री.अजय एकळ, श्री. सुनील सोनवलकर, आत्मा विषयतज्ञ श्री.सूरज फुले व गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थीत होते.या प्रसंगी हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री.योगेश भोंगळे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी कृषी दिन व कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. डॉ.आर.एम.गारकर यांनी ऊस पिकाबद्दल पिकाच्या लागवडी पासून, बेणे निवड, ऊसाच्या जाती, बेने प्रक्रिया,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व एकरी शंभर टन उत्पादन सहज शक्य असल्याचे सांगीतले तसेच शेतकऱ्यांच्या सर्व शंकाचे निरसन केले.
तसेच या कार्यक्रमानंतर शास्त्रज्ञांची प्रक्षेत्र भेट अंतर्गत गावातील प्रगतशील शेतकरी श्री. पोपटराव गायकवाड यांच्या शेतावर सोयाबीन, मका, ऊस आणि बांधावरील तूर लागवड या प्रक्षेत्रानां भेटी देऊन शास्त्रज्ञ डॉ. गारकार सर यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी प्रगतीशील शेतकरी मनोहर जाधव,मयुर मोहिते, अर्जुन जाधव,धनंजय वाघ, ज्ञानेश्वर शिंगाडे, संपत मोरे, राममंद्र मोरे, अजित जाधव, किसन फडतरे,बाळासो खरात सागर दडस,रियाज शेख,मारूती शिर्के गुरूजीआदि परिसरातील शेतकरी मोठया संखेने उपस्थीत होते. पोपटराव जाधव यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!