श्रीमंत संजीवराजे यांना विधान परिषदेवर संधी द्या : श्रीमंत शिवरुपराजे*

आसु : फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सतत संपर्कात राहुन त्यांच्या प्रश्नांची मांडणी  
शासन/प्रशासनासमोर करताना त्याची सोडवणूक झाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील असलेले, त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष म्हणून या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोगही सतत लोकांच्या हितासाठी केलेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना महाराष्ट्र विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली तर ते संधीचे सोने करतील असा विश्वास फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.
*प्रचंड लोकप्रियता लाभलेले बहुआयमी नेतृत्व*
      श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानसभा किंवा लोकसभेवर मतदारांनी निश्चित मोठया मताधिक्याने निवडून दिले असते, मात्र इतकी लोकप्रियता लाभलेल्या श्रीमंत संजीवराजे यांनी ती संधी पक्षाकडे कधी मागितली नाही, अन्यथा माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या हातून गेला नसता, आजही ते स्वतः अशी मागणी करण्यास उत्सुक नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदराव पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार काम करणे, ते सोपवतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट करीत आम्हा कार्यकर्त्याना श्रीमंत संजीवराजे तथा बाबा सतेच्या पदावर असावेत त्यामाध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा असल्याने आपण, ही मागणी करीत असल्याचे यावेळी सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
*ग्रामपचायतीपासून विधानसभेपर्यंत एकहाती सतेचे शिल्पकार*
       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यामध्ये  ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ठेवण्याचे काम  महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा. सुप्रियाताई सुळे, आ. दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले असल्याचे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी निदर्शनास आणून दिले.
*त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी*
      फलटण कोरेगाव विधान सभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने श्रीमंत संजीवराजे यांना विधानसभा मतदार संघामधून निवडून जाता आले नाही. वास्तविक पाहता  फलटण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला असून त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुप्रीमो  खा. शरद पवार यांनी घेऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उप सभापती सौ. खरात व त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्यांनी खा. शरद पवार, उप मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे कडे केली आहे.
*श्रीमंत संजीवराजे यांना संधी देऊन २५/३० वर्षाच्या कामाचा गौरव व्हावा*
       सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला असून हा बालेकिल्ला उभारण्यात फलटणकरांनी जिल्हावासीयांच्या सहकार्याने
पक्षश्रेष्ठीच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावली आहे. विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्टींनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी अपेक्षा श्रीमंत खर्डेकर  व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!