1रेडिओ च्या माध्यमातून शिक्षण
बारामती: 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे .विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमावस्था निर्माण झाली आहे की मुलांच्या शिक्षणाचे काय ? कोरोनाचा वाढता प्रसार ऑनलाईन साठी सर्वच मुलांकडे मोबाइल असेलच असे नाही ही सर्व समस्या लक्षात घेऊन विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यामध्ये विचारविनिमय होऊन इयत्ता पाचवी ते आठवी सर्व सहा विषयांचे क्रमवार रोज ठराविक वेळेत वसुंधरा वाहिनी च्या माध्यमातून अध्यापनाचे प्रसारण दिनांक एक जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये होणार आहे .शाळेचे विषयशिक्षक आपापल्या विषयांचे अध्यापन वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून करणार आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री .शिंदे सर यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केले आहे की एक जुलैपासून प्रसारित होणाऱ्या अध्यापनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा.तसेच इतर शाळेच्या इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांनी या प्रसारणाचा लाभ घ्यावा. ” प्रसारण वेळा “
इ. ५ वी – ८ : ०० ते ८ : ३०
इ. ६ वी – १० : ०० ते १० : ३०
इ. ७ वी – ३ : ३० ते ४ : ००
इ. ८ वी – ४ : ३० ते ५ : ००
शाळेचे विषय शिक्षक व्हाॅट्सॲप ग्रुप वर प्रसारणाची तारीख आणि वेळ पाठवणार आहेत. या उपक्रमास विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे अनमोल मार्गदर्शन आणि वसुंधरा वहिनीचे मोलाचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती रामचंद्र शिंदे ( मुख्यध्यापक विद्या प्रतिष्ठान, मराठी माध्यमिक शाळा) यानि दिली आहे