बारामती : बारामतीच्या वैभवात भर घालणारीसंस्था म्हणजे कारवार एव्हिऐशन होय.भारतामधील नामांकित विमान प्रशिक्षण देणारी संस्था आणि महाराष्ट्रात गेले वीस वर्षापासून कमर्शियल पायलट या अभ्यासक्रमाचे शिक्षणाचे देणारे माहेरघर अकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिऐशन या संस्थेला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.
भारतामधील विमान प्रशिक्षण संस्था या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिऐशन (D.G.C.A) यांच्या मान्यते व निर्देशानुसार चालत असतात. त्यामध्ये त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणं हे प्रत्येक संस्थेवर बंधनकारक असते, क्वाॅलिटी ट्रेनिंगच्या मार्फत चांगले पायलट बनवण्याची सर्वात मोठी जबाबदारी संस्थेवर असते. सद्यस्थितीत भारतामध्ये अंदाजे 20 ते 25 संस्था कार्यरत असून, महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या अकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिऐशन संस्थेचे नाव खराब करून अप्रत्यक्षरीत्या इतर संस्थांना त्याचा फायदा करून देणे हा त्यामागचा मोठा उद्देश असल्याचे दिसून येत आहे.
ॲकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिऐशन या संस्थेने मागील वीस वर्षाच्या कालावधीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत भारतातील एकूण व्यावसायिक पायलट पैकी १५% टक्के म्हणजे जवळपास पंधराशे (१५००) इतके व्यावसायिक पायलट आपल्या बारामती ने दिलेले असून, सर्व पायलट भारतातील वेगवेगळ्या एअरलाइन्स कंपनीमध्ये मोठमोठ्या पदावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, हि बाब बारामतीसाठी अभिमानास्पद आहे.
प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षकाने गैरवर्तणूक केल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केलेला आहे. सदर घडलेल्या प्रकाराबाबत विद्यार्थिनीने संस्थेकडे केलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाबाबत चौकशी सुरु केलेली असताना, तसेच तक्रारदार विद्यार्थिनीने बारामती तालुका पोलीस स्टेशनकडे गुन्हा नोंदविलेला असताना, वेगवेगळ्या सामाजिक संस्थां संघटनांमार्फत दमदाटीची भाषा वापरून धमक्या देऊन संस्थेला वेठीस धरणे, संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करणे, तोडफोडीची भाषा वापरणे, तसेच सदर प्रकाराबाबत खोट्यानाट्या बातम्या देऊन संस्थेचे नाव खराब करणे असे गैरप्रकार जाणीव पूर्वक काही मंडळी करीत आहेत. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील विविध मार्गाने संस्थेला अडचणीत आणून बदनाम करण्याचे बेकायदेशीर कृत्य केले जात आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे नेमके याचवेळी संस्थेचे नाव जाणीवपूर्वक बदनाम करून, नवीन प्रवेश प्रक्रियेत अप्रत्येक्षरित्या अडथळा निर्माण करणे. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश इतर संस्थेमध्ये कसे जातील यासाठी प्रयत्न करणे. तसेच सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची व पालकांची दिशाभूल करून संस्थेच्या विरोधात कट कारस्थान करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे कि काय ? अशी शंका यामुळे निर्माण होऊ लागली आहे.
बारामती व अकॅडमीचे नाव बदनाम करण्याची जणु काही शपथ काही व्यक्ती व संघटनांनी घेतली असल्याचे जाणवत आहे. सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या अशा व्यक्ती / संस्थांच्या विरोधात यापुढे कायदेशीर कारवाई केली जाणार असून त्याच्या विरोधात नुकसानभरपाईचा दावा दाखल करणार असल्याचे कार्व्हर एव्हिऐशन या संस्थेच्या वतीने महा व्यवस्थापक प्रमेश पारीख यांनी सांगितले.
*न्यायप्रविष्ट विषय*
विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन अकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिऐशनने सदरची तक्रार ही संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तसेच सुप्रीम कोर्टाच्या विशाखा गाईडलाईननुसार आय.सी.सी कमिटीला सुपूर्त करण्यात आलेली असून आय.सी.सी कमिटीने सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कार्यवाही त्वरित सुरु केलेली आहे.
या सर्व बाबी न्यायप्रविष्ट असल्याने या न्यायिक प्रक्रियेमध्ये सर्व बाबींना सर्वतोपरी सहकार्य करणे ही संस्थेची प्राथमिक जबाबदारी असून, संस्था न्यायालयीन कामकाजामध्ये अथवा पोलिसांच्या तपासास संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. यामध्ये संस्था कोणालाही पाठीशी घालणार नाही. तपासाअंती दोषींवर संस्थेमार्फत देखील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
परंतु न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संस्थेला यामध्ये काहीही करण्याचा अधिकार नाही याची जाणीव संस्थेविरोधात कारवाया करणाऱ्या व्यक्तींनी व संस्थेंनी ठेवली पाहिजे.