फलटण : राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये फलटण तालुक्यातील तुषार लक्ष्मणराव गुंजवटे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल त्याचे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार व अभिनंदन करण्यात आला.
नायब तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल तुषार गुंजवटे यांचा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
तुषार गुंजवटे याचे मुळ गाव झिरपवाडी असून त्याचे प्राथमिक शिक्षण मालोजीराजे प्राथमिक विद्या मंदिर फलटण येथे तर माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण पाॅलीटेक्निक हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज फलटण येथे झाले. त्यानंतर शासकीय इंजिनिअर काॅलेज कराड येथे ऐ & टिसी इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. ऑल इंडिया श्री शिवाजीराजे मेमोरियल काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. सद्या ते टाटा कन्सलटिंग पुणे येथे नोकरीस होते.
त्यांचे वडील लक्ष्मणराव गुंजवटे हे मिंडवस्ती( साठेफाटा) येथे वरिष्ठ मुख्याध्यापक तर आई सौ. छाया लक्ष्मणराव गुंजवटे या बोरकरवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.