फलटण मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा रद्द झाल्याने प्रतिकात्मक सोहळ्याचे आयोजन करीत समाज आरती पार पाडली

 
फलटण प्रतिनिधी –  गेली अनेक वर्षे आळंदी ते पंढरपूर या मार्गावर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा साजरा केला जात होता.मात्र या वर्षी कोरोनाचा पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र आळंदी ते पंढरपूर मार्गावरील पाहिले उभे रिंगण हे चांदोबाचा लिंब तरडगाव येथे पार पाडले जाते तो रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक दोन्ही बाजूंनी पाहायला गर्दी करीत असतात. याची देही याची डोळा एकदा तरी हा सोहळा डोळे भरुनी पहावा असे प्रत्येकाला वाटत असते मात्र या वर्षी हा रिंगण सोहळा पाहता आला नाही.
       सातारा जिल्ह्यात संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या तरडगावच्या मुक्कामानंतर माऊलींचा सोहळा प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या फलटणकडे रवाना होतो आजच्या दिवशी फलटण येथील विमानतळ परिसरातील पटांगणावर लाखो वारकरी विसावा घेतात मात्र कोरोनामुळे सोहळा रद्द झाल्याने फलटणमध्ये प्रतिकात्मक सोहळा  समाजआरती करून साजरा करण्यात आला.
   कोरोनामुळे सर्वच ठिकाणी पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याने अनेकवर्षाची पालखीची परंपरा खंडित झाली त्यामुळे भक्तजन नाराज असले तरी आजचा पालखी सोहळ्याचा फलटण मुक्काम गृहीत धरून काही भाविकांनी सायंकाळी पालखी तळावर प्रतिकात्मक समाज आरती केली ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करण्यात आला ही समाज आरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करून करण्यात आली प्रसादाचे वाटप करण्यात आले.

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!
  
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!