सिटी स्कॅन व एम.आर.आय. सिस्टिमच्या खरेदीसाठी 26 कोटी मंजूर
बारामती :पुढारी वृत्तसेवा पुणे मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा आता बारामती मेडिकल कॉलेज मध्ये मिळणार आहेत.बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयासाठी सिटी स्कॅन व एम.आर.आय. सिस्टिमच्या खरेदीसाठी 26 कोटी रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये सिटी स्कॅनसाठी 8 कोटी, एमआरआय मशीनसाठी 12 कोटी, तर सी.एस.एस.डी. (सेंट्रल स्टरलाईज सिस्टीम डिपार्टमेंट) साधनसामग्रीसाठी सहा कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली गेली.
बारामतीच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे महत्वाचे आहे. पाचशे खाटांच्या क्षमतेचे 12 मोड्युलर ऑपरेशन थिएटर्स असलेले अत्यंत अत्याधुनिक सुविधा असलेले व शासकीय दरात रुग्णावर उपचार होणारे हे रुग्णालय असल्याने अनेकांना या रुग्णालयाचा फायदा होणार आहे.
शासकीय दराने सिटी स्कॅन व एम.आर.आयची सुविधा येथे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे केवळ बारामतीच नाही, तर पंचक्रोशीतील रुग्णांना अल्प दरात या सुविधांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजयकुमार तांबे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. सामान्यांना या यंत्रणेमुळे आर्थिक दिलासा प्राप्त होण्यास मदत होणार आहे
*अजित पवार यांचे वैयक्तिक लक्ष*
उपमुख्यमंत्री अजित पवार हे हॉस्पिटल मंजुरी पासून वैयक्तिक लक्ष देत असतात त्यामुळे मोठ्या शहरात मिळणाऱ्या सर्व सुविधा बारामतीत मिळाव्यात हा त्यांचा प्रयत्न असतो त्यामुळे याचे सर्व श्रेय अजित पवार यांना जाते
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!