साखरवाडी विद्यालयातील विद्यार्थ्याने घरीच केला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

फलटण :- सध्या जगावर करोना महामारीचे संकट असल्यामुळे सोशल डिस्टंसिंग व गर्दी  करणे यावर निर्बंध आसल्यामुळे आज २१/०६/२०२० रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्यामुळे साखरवाडी विद्यालय साखरवाडी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच योगा प्रात्यक्षिक करून योगदिन साजरा केला . 
       साखरवाडी विद्यालयमध्ये गेले अनेक वर्ष मल्लखांब व योगाचे प्रशिक्षण दिले जाते तसेच मल्लखांबावर वेगवेगळे योगासने केली जातात. मलखांब व योगासन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि योगासनाचे उपयोगा मल्लविद्या (कुस्ती) यासाठी होतो. तसेच आरोग्यासाठी शरीर लवचिक व काटक बनवण्यासाठी होतो. त्याचबरोबर मनाची एकाग्रता वाढते. क्षणात निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते. 
साखरवाडी विद्यालयातून आतापर्यंत शिक्षणाबरोबर ,योगासन व मल्लखांबाचे शिक्षण घेऊन शेकडो  विद्यार्थी बाहेर पडले आहेत. ते आपापल्या पद्धतीने मल्लखांब व योगासनाचा सराव करत असतात. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थी हितेंन्द्र चंद्रकांत भोसले राहणार साखरवाडी (पिंपळवाडी) यांनी आपल्या घरी योगासने केली व योगादिन साजरा केला त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे साखरवाडी विद्यालयाचे माजी  मल्लखांब प्रशिक्षक व मल्लखांब पंच हनुमंतराव खंडझोडे यांनी त्याला मार्गदर्शन केले तसेच विद्यालयातील प्राचार्य ,उपप्राचार्य, संचालक मंडळाने  हितेंद्र भोसले याला प्रोत्साहन दिले .

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!