शिवसैनिकांवरील हल्ले खपवुन घेतले जाणार नाहीत : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख

फलटण :- शिवसेनेचे माजी सातारा जिल्हाप्रमुख व सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना आदरणीय असणारे जेष्ठ शिवसैनिक सन्माननीय नरेंद्र पाटील यांचेवर वर्दळीच्या ठिकाणी सातारा नगरपालिकेत दिवसा ढवळ्या प्रशासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत, बेसावध व एकटे असताना संबंधित ठेकेदार व त्याच्या सहका-यांनी भ्याड हल्ला केला व त्या मारहाणीचे व्हिडिओ शुटींग करुन सोशल मिडीयाद्वारे सर्वत्र व्हायरल करुन नरेंद्र पाटील यांची बदनामी केली आहे. सदर मारहाणीचा फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करत असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
संबंधित ठकेेदार व त्याच्या सहका-यांनी नरेंद्र पाटील यांचेवर हल्ला करून मारहाणीनंतर सातारा पोलीस स्टेशनला नरेंद्र पाटील यांचेवर खोटे गुन्हे दाखल केले. संबंधित ठेकेदाराने आधी नरेंद्र पाटलांना मारहाण केली व नंतर कायद्याची वाट धरुन सातारा पोलीस प्रशासनाचीही एकप्रकारे फसवणूकच केली आहे. शिवसैनिक या असल्या भ्याड हल्ला व खोट्या केसेसला भीक घालत नसतो. या असल्या खोट्या तक्रारी म्हणजे एखाद्या चांगल्या कार्यातुन मिळालेला बहुमान आहे असं शिवसैनिक समजतो. अन्यायाविरोधात आवाज उठवला की असे मेडल रोज भेटत असतात. शिवसैनिक असल्या खोट्या तक्रारींना घाबरत नाही, घाबरणार नाही. यापुढेही उलट जोमाने आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार उघडकीस आणुन दाखवु. शिवसेना ही जनतेवर होणा-या अन्यायाविरोधात लढणारी, दम देणारी संघटना आहे. दम खाणारी नाही असे शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी आक्रमकपणे शिवसेना स्टाईलने उत्तर दिले.
निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेप्रकरणी जाब विचारणा-या जागरुक सातारकर नागरिक व शिवसेना माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनाच दमदाटी करुन, जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करुन कायदा पायदळी तुडवणारा सदर व्यक्ती ठेकेदार आहे की गुंड ? तसेच कायदा पायदळी तुडवणा-या व्यक्तीचा पोलीस प्रशासन व कायदा आता सन्मान करणार आहे का ? नगरपालिका अशा बेशिस्त ठेकेदारांना तडीपार करणार का ? सातारकर जनतेचे सर्व लक्ष पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडे लागले आहे.
राडा करणे हा शिवसैनिकांचा धंदा आहे असे म्हणतात. होय हे खरे आहे, आम्ही महाराष्ट्रातील जनतेवर जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे शिवसैनिक आक्रमक होत रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम सातत्याने आम्ही शिवसैनिक करत असतो. परंतु शिवसैनिकांवरच जर असा बेसावधपणे भ्याड हल्ला कोणी करत असेल तर शिवसैनिक संबंधितास तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. पोलीस प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा संपुर्ण सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाचीच असेल. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेनेच्या वरिष्ठांना शिवसैनिकांच्या तीव्र भावना निदर्शनास आणुन दिलेल्या आहेत. शिवसेना उपनेते नितिन बानुगडे पाटील यांचे आदेशानुसार व जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख व आदी वरिष्ठ-कनिष्ठ शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीतुन पुढील योग्य निर्णय घेतला जाईल. पालकमंत्री, गृह राज्यमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

 PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!