१५ जून ते ३० जून या कालावधीमध्ये फ्री ऑनलाइन डान्स क्लासचा लाभ घर बसल्या सर्वांनी घ्यावा :-प्रशांत भोसले

फलटण /प्रतिनिधी :कोरोना या महामारीचा संसर्ग संपूर्ण जगभरात झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या महाभयंकर रोगाची साखळी तोडण्यासाठी बहुतांश देशांनी लॉक डाऊन चा पर्याय निवडला त्यामध्ये आपल्या भारत देशाचा ही समावेश आहे. या काळात अनेक मोठ्या कंपन्या सरकारी कार्यालये व शिक्षण संस्था या बंद ठेवण्यात आल्या त्या सोबतच जिम, गार्डन, स्विमिंग पूल, डान्स क्लास या सर्व गोष्टी लॉक डाऊन मध्ये बंद ठेवण्यात आल्या त्यामुळे शारीरिक व्यायामावर परिणाम झाला आहे. यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. 
 काही प्रमाणात परिस्थिती पूर्वत येत असताना  सरकारी कार्यालये , कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु शरीराची  व्यायाम होणारे साधने बंदच आहेत. तसेच लॉक डाऊनच्या काळात घराबाहेर पडता येत नसल्याने लहान चिमुरड्यांना खेळण्यास बंदी आहे.
घरी बसून नैराश्य, मानसिक तान, चिडचिड, घरातील भांडण याचेही प्रमाण वाढले आहे. तसेच या महामारी मध्ये शरीराची प्रतिकार क्षमता वाढावी म्हणुन व्यायाम होणे गरजेचे आहे, परंतु शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होण्यासाठी नृत्य हा एक उत्तम आणि लहान मोठ्यांच्या आवडीचा विषय आहे. 
या सर्व गोष्टींचा विचार करून कला क्षेत्रात योगदान असलेली नृत्यकला अकॅडमीचे संचालक श्री प्रशांत भोसले सर यांनी  फ्री ऑनलाइन डान्स क्लासचा सर्वांना फायदेशीर असा उपक्रम राबविला आहे.
 या उपक्रमामध्ये गुगल मीट या ॲप्लिकेशन द्वारे ऑनलाईन नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. वय वर्षे 3 ते 12 व  वय वर्षे 13 ते 30 अशा वयोगटाच्या  वेगवेगळ्या बॅचेस सुरू आहेत. 
लॉक डाऊनचा काळात घरबसल्या नृत्यामुळे शरीराची चांगल्या प्रकारे हालचाल व व्यायाम होण्यास मदत होते तसेच ताल धरायला लावणारे संगीत यामुळे मन प्रसन्न राहते व घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. 
नृत्यकला अकॅडमी ही संस्था फलटण सारख्या छोट्या शहरातून फ्री ऑनलाइन डान्स क्लासचा उपक्रम राबवत आहे. या संस्थेला महाराष्ट्रातून नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून सभासद सहभाग घेत आहेत, तसेच भारतातील इतर राज्यातून चांगला  प्रतिसाद मिळत आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातून सभासदांच्या नाव नोंदणी होत आहेत.
15 जुन 2020 रोजी सुरू केलेल्या या उपक्रमाला पाच दिवसांमध्ये 350 सभासदांनी सहभाग नोंदविले आहे, यामध्ये मोठे पदाधिकारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस अशा वेगळ्या पदावरती कार्यरत असलेल्या व आपली आवड ओळखून व शरीराची हालचाल होण्या करीता नृत्यकला अकॅडमी तर्फे घेण्यात येत असलेल्या फ्री ऑनलाईन डान्स क्लासचा चांगला असा पर्याय निवडला आहे.
 सर्व सहभागी झालेल्या व नृत्याची आवड असलेल्या सभासदांकडून नृत्यकला अकॅडमीचे संचालक प्रशांत भोसले यांचे कौतुक होत आहे.
घरातील मोठी व्यक्ती चिमुरडी मुले सगळे एकत्र मिळून नृत्याचा आनंद घेत असतात.
 एकत्र नृत्य करत असल्या कारणाने घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व लॉकडाऊन मुळे प्रत्येक व्यक्तींमध्ये आलेला आळस कंटाळा या फ्री ऑनलाइन डान्स मुळे झटकून टाकला आहे. 
15 जुन ते 30 जुन 2020 या कालावधी मध्ये फ्री ऑनलाइन डान्स क्लास या साठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे अावाहन नृत्यकला अॅकॅडमीचे संचालक श्री. प्रशांत भोसले यांनी केले आहे.

  PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!