फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने वडले गावासाठी केली विशेष मदत श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप

दि.16 दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असलेने हॉटस्पॉट ठरलेले वडले गाव सील केलेमुळे संपूर्ण गावासाठी मागणीनुसार फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून डॉक्टर यांचे सल्ल्यानुसार मोफत औषधे , आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका यांचेसाठी  एकूण 12 PPE kit, गाव निर्जंतुकीकरण करणेसाठी सोडियम हायपोक्लोराइड 25 लिटर, एकूण 650 बॉटल हँड सॅनिटायझर आणि जादा पाच लिटर चे 10 कॅन हँड सॅनिटायझर,एकूण 1300 वॉशेबल मास्क,एकूण 30 कुटुंबियांना तांदूळ,गहू आणि भाजीपाला समावेश असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि ग्रामपंचायत सद्स्य यांचे वर्गणीतून सर्व कुटूंबियांना इम्युनिटी बुस्टर कोरोना प्रतिबंधात्मक आर्सेनिक 30 होमियोपॅथीक गोळया ,या सर्व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप श्रीमंत विश्वजितराजे आणि बाजार समितीचे व्हाइस चेअरमन भगवानराव होळकर यांचे हस्ते करणेत आले.
*उपस्थिती*
श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सदस्य पंचायत समिती, व्हाइस चेअरमन,भगवानराव होळकर,बाजार समिती सचिव शंकरराव सोनवलकर,सरपंच अनुराधा सोनवलकर,माजी सरपंच व विद्यमान सदस्य  पोपटराव सोनवलकर ,छाया शेंडगे,दत्तात्रय लाळगे,पोपट मोरे,वडले वि.का.स सोसोयटी.सचिव विठ्ठल शेंडगे ,बाबुराव सोनवलकर, मोहन डांगे ,भाडळी बु, ग्रामसेविका उज्वला गार्डी व ग्रामपंचायत स्टाफ,आरोग्य सेविका फुले मॅडम, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स,रमेश ठोंबरे,भिमराव भोसले,सतिश भोसले,सागर सोनवलकर,लक्ष्मण शेंडगे ,रविंद्र कुचेकर,रामचंद्र कुचेकर आणि बाळू कुचेकर इ. ग्रामस्थ हे उपस्थित होते.
*लॉकडाऊनच्या कालावधीत फलटण बाजार समितीने केलेल्या कामाचे विश्वजितराजे यांचेकडून कौतुक*
लॉकडाऊनच्या कालावधीत फलटण बाजार समिती अखंडितपणे श्रीमंत रामराजे यांचे नेतृत्वाखाली आणि आमदार दिपकराव चव्हाण आणि श्रीमंत संजीवराजे यांचे मर्गदर्शनाखाली आणि रघुनाथराजे यांचे कल्पक दृष्टिकोनातून  अखंडितपणे सुरु असून 8 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकौंटला बाजार समितीने वर्ग केले आहेत,मोफत फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातुन दहा हजार पेक्षा अधिक आणि “मालोजी शिदोरी ” व “शिवभोजन ” च्या माध्यमातून चौदा हजार पेक्षा अधिक लोकांना मोफत जेवण,विलगिकरण कक्षासाठी जेवण,अलगुडेवाडी शेल्टर कॅम्प साठी मार्केट कमिटीने केलेले नियोजन ,मास्क सॅनिटायझर वाटप,महसूल कर्मचारी व पोलिसांसाठी विशेष मदत,मोफत जीवनावश्यक वस्तुचे किट व आर्सेनिक अल्बम चे वाटप इ अनेक शेतकरी हितास्तव नाविन्यपूर्ण उपक्रम बाजार समितीने राबवित असल्याने श्रीमंत विश्वजितराजे यांनी मार्केट कमिटीच्या सर्व टीम चे कौतुक केले.
*श्रीमंत रघुनाथराजे आणि मार्केट कमिटीचे विशेष आभार*
कोरोना संसर्ग चे पार्श्वभूमीवर महामारीच्या विरोधात लढा देणेकरिता श्रीमंत रघुनाथराजे यांनी स्वतः आणि सचिव शंकरराव सोनवलकर यांचे समवेत वडले गावाला भेट दिली, मनोधैर्य वाढविले,स्वतःची व कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबाबत बहुमोल असे मार्गदर्शन आणि सूचना तसेच संपूर्ण गावाला सर्वतोपरी मदत करणेचे आश्वासन दिले आणि काल आणि आज वडले गावाने मागीतलेली सर्व मदत ग्रामपंचायतीस सुपूर्द केली.यास्तव सर्व ग्रामस्थांच्या वतीने पोपटराव सोनवलकर यांनी श्रीमंत रघुनाथराजे यांचे आणि मार्केट कमिटी संचालक मंडळ आणि सचिव यांचे विशेष आभार व्यक्त केले.
                       PHALTAN                                      TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!