फलटण येथील महावितरण कार्यालयातील लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात

फलटण : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या फलटण उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना नवीन मीटरचे कोटेशन देण्यासाठी वीस हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.
याबाबत लाच लुचपत विभाग सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी फलटण येथील फलटण उपविभागीय कार्यालय येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदकुमार भानुदास काळे, रा.मोनिता सृष्टी अपार्टमेंट , डी.एड.चौक , फलटण ता. फलटण जि. सातारा यांनी शरातील इमारतीचे ११ नवीन मीटरचे कोटेशन
इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर यांना देण्यासाठी तडजोडी अंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार आज मंगळवार दि. १६ रोजी लाच घेताना उपविभागीय कार्यालय फलटण येथे तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये रक्कम स्वीकारल्यानंतर नंदकुमार काळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नंदकुमार काळे यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदरची सापळा कारवाई राजेश बनसोडे पोलिस अधीक्षक व श्रीमती सुषमा चव्हाण अप्पर पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे , पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलिस निरीक्षक अविनाश जगताप , सहाय्यक फौजदार आनंदराव सपकाळ, पोलिस हवालदार संजय साळुंखे, पोलिस नाईक संजय अडसुळ प्रशांत ताटे, विनोद राजे,पोलिस कॉन्स्टेबल तुषार भोसले, निलेश वायदंडे, म.पो.कॉ.शितल सपकाळ यांनी केली.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी जर कोणाची लाच मागणी झाल्यास त्याबाबत तक्रार असल्यास पोलिस उप अधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , सि.स.नं ५२४ / अ , जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ , सदरबझार सातारा येथे अथव तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्सअप नंबर ७८७५३३३३३३ नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत विभाग सातारा यांच्याकडून करण्यात आले आहे.

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!