27 जणांना दिला रुग्णालयातून डिस्चार्ज 169 जणांचे नमुने तर मृत्यु पश्चात 2 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 13 ( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 8,  सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 3, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 2, बेल एअर  हॉस्पिटल पाचगणी येथील 11,  खावली कोरोना केअर सेंटर 3 असे एकूण 27 जणांना दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

           यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्यांमध्ये कराड तालुक्यातील  बहुलेकरवाडी येथील 60 वर्षीय् पुरुष, खराडे  (हेळगाव ) येथील 55 वर्षीय व 45 वर्षीय  महिला,  पाटण तालुक्यातील दिवशी येथील 27 वर्षीय पुरुष, जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व 2 वर्षाचा बालक,  काळेवाडी येथील 46 वर्षीय पुरुष,  सळवे येथील 45 वर्षीय महिला.

सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणाऱ्यांमध्ये कराड तालुक्यातील खराडे  येथील 15 युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवक, शिंदेवाडी विंग येथील 15 वर्षीय युवक.

बेल एअर  हॉस्पिटल पाचगणी येथे दाखल असणाऱ्यांमध्ये वाई तालुक्यातील जांभळी येथील 12 वर्षीय युवती, वाई येथील 41 वर्षीय पुरुष व 36 वर्षीय महिला, आनेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, दह्याट येथील 8 महिन्यांची बालिका व 27 वर्षीय महिला. खंडाळा तालुक्यातील अहिरे येथील 24 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील अंबेघर येथील 59 वर्षीय पुरुष, काटावली येथील 29 वर्षीय पुरुष,  वाहगाव येथील 34 वर्षीय पुरुष, दापवडी येथील 55 वर्षीय महिला.

        कोरोना केअर सेंटर खावली येथे दाखल असणाऱ्यांमध्ये सातारा तालुक्यातील वावदरे येथील  56  वर्षीय पुरुष. तसेच 8 जून 2020 रोजी सातारा येथील धनावडे वाडी,  येथील 35 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील परतवाडी येथील 51 वर्षीय पुरुष यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

        ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे दाखल असणाऱ्यांमध्ये 23 व 57 वर्षीय कटापूर येथील  महिलांचा समावेश आहे.

        169 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 23, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 27, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 17, फलटण येथील 3, कोरेगाव येथील 14, वाई येथील 14, शिरवळ येथील 7, रायगांव येथील 6, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 14, दहिवडी येथील 19 असे एकूण 169 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड , क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

            यामध्ये फलटण तालुक्यातील फलटण येथील 70 वर्षीय महिलेचा व जावली तालुक्यातील गांजे येथील 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात नमुना कोविड संशयित म्हणून तपासणी करीता पाठविण्यात आला  असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!