बारामती: कोरोना संसर्ग व लॉकडाऊन मुळे एसटी चे उत्त्पन्न राज्यात बुडाले आहे या वर उतारा म्हणून एसटी ने उत्पन्न वाढण्यासाठी मालवाहतूक सुरू केली आहे परंतु जर अपघात झाला तर मोठे नुकसान होईल या साठी वाहतूक बस बरोबर हेल्पर दिल्यास नुकसानीची तीव्रता कमी होईल त्यामुळे हेल्पर किंवा कोणीही मदतनीस द्यावे अशी मागणी एसटी कर्मचारी करीत आहेत.राज्यात मालवाहतूक साठी एसटी ला यश मिळत असताना एटी कामगारांनी काही प्रश्न उपस्तीत करून सहकार्याची मदत मागितली आहे.मालवाहतूक करताना एकटाच चालक असणार आहे पण कदाचित बस बंद पडली, टायर पंक्चर झाला किंवा इतर कोणता तांत्रिक बिघाड झाल्यास चालक जवळच्या डेपोला फोन करून कल्पना देणार त्यानंतर त्या डेपोच्या उपलब्ध कर्मचारी संख्ये नुसार कर्मचारी कधी येतील ,किती वेळ लागेल ये सांगता येत नाहीत.त्यामुळे मालवाहतूक बस तो पर्यंत त्याच जागेवर थांबेल परंतु जर बस बरोबर तांत्रिक हेल्पर किंवा सहायक असेल तर बस मध्ये बिघाड झाल्यास तो त्वरित बस सुरू करण्याचा प्रत्यन करेल,टायर पंक्चर असेल तर चालकाच्या मदतीने पंक्चर काढेल किंवा तिथेच सुटणारा तांत्रिक बिघाड चालकाच्या साह्याने सोडवेल त्यामुळे वेळ वाचेल व बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल व माल इच्छित स्थळी वेळेत पोचेल त्यामुळे महामंडळ वेळेत सेवा देत असल्याचा संदेश सर्वत्र राज्यात जाईल व नवीन ग्राहक आणखीन मिळतील त्यामुळे कार्यशाळा मधील तांत्रिक हेल्पर किंवा सहायक माल वाहतूक बस सेवेसाठी चालकाच्या बरोबर द्या अशी मागणी राज्यातील एसटी कर्मचारी करीत आहेत.
चौकट खाजकी मालवाहतूक मध्ये चालक बरोबर कलीनर असतो तर एसटी च्या मालवाहतुकीस बरोबर तांत्रिक हेल्पर किंवा सहायक कारागीर किंवा अजून एक (एकूण 2) चालक द्या तसेच वजन क्षमता जास्त वाहने असल्याने प्रत्येक बसेस ची स्प्रिंग (पाटे ) क्षमता जास्त करा जेणेकरून रस्त्यामध्ये ब्रेक डाऊन चे प्रमाण कमी होईल व बस मध्ये जॅक,व्हील पाना, टॉमी व इतर तांत्रिक प्राथमिक हत्यारे उत्तम दर्जाची द्या अशी मागणी एसटी कामगार सेनेचे प्रसिद्धी सचिव बाळासाहेब गावडे यांनी केले आहे.