फलटण प्रतिनिधी – कोरोनाची दाहकता सर्व क्षेत्रात जाणवत आहे.मात्र शैक्षणिक क्षेत्रात आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे लागेल. या साठी अभियांत्रिकी कॉलेज मध्ये डिग्री व डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळेल या उद्देशाने प्राचार्य व सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. ते इंजिनिअरिंग कॉलेज येथील झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या कमिन्स कंपनी कडून इंजिनिअरिंग कॉलेज ला खूप मदत होत आहे. तसेच इथून डिग्री व डिप्लोमा करणाऱ्या मुलांना येथील मेगा प्रोजेक्ट मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या साठी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मुलांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
या वेळी उपस्थित प्राचार्य डॉ.अजय देशमुख,डॉ.राजवैद्य(गुंगा),शरद दोषी,भोजराज नाईक निंबाळकर, हेमंत रानडे,अरविंद निकम,श्रीकांत फडतरे व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ.अजय देशमुख यांनी सांगितले की या पुढे जगाच्या बरोबरीने मुलांना घडवायचे असेल तर त्याच तोडीचे शिक्षण आपल्या मुलांना द्यावे लागणार आहे. या साठी आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्या क्षेत्रात नोकरी/व्यवसाय अथवा करियर घडेल या धर्तीवर त्यांना मार्गदर्शन व शिक्षण दिले जाणार आहे. या साठी इथून पुढे इंडस्ट्री रेडीनेस ऑफ इंजिनिअर्स,सेंटर ऑफ एक्सलन्स,इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑटोमेशन च्या मदतीने चर्चासत्र, अभियांत्रिकीच्या गणितावरील चर्चासत्र,अभ्यासक्रम त्यातील मूल्यवर्धक घटक आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण व स्किल मधील सुधारणा व विकास याच बरोबर उद्योग क्षेत्रात (mou) मोठमोठ्या कंपनीच्या माध्यमातून इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासाच्या सोई, इंटर्नशिप व प्लेसमेंट, विद्यार्थ्यांच्या एक्सलन्स साठी शिक्षकांकडून प्रामाणिक व योग्य ते प्रयत्न केले जातील याची ग्वाही प्राचार्य देशमुख यांनी दिली. दरम्यान या मुळे त्या मुलांची सर्वांगीण उन्नती होईल.जिज्ञासू वृत्ती वाढावी या साठी तसेच संशोधनात्मक व उद्योजकता वाढेल.असा आमचा प्रयत्न राहील असे प्राचार्य डॉ.अजय देशमुख यांनी सांगितले या वेळी इतर शिक्षक उपस्थित होते.