फलटण – नागपुर येथील अरविंद बनसोड हत्याकांंड व पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप या तरुणाच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ फलटण येथे कामगार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक सनी काकडे,महादेव गायकवाड,रवि मोरे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,२७ मे रोजी नागपुर येथील अरविंद बनसोड या भिमसैनिकाचा मिथलेश उमरकर या गॕस एजान्सीच्या मालकाने निघृणपणे खुन केला व त्याचबरोबर ८ मे रोजी पिंपरी चिंचवड येथे विराज जगताप या २० वर्षीय तरुणास भर रस्त्यामध्ये लोखंडी सळई,तलवार,दांडके,कोयत्याने मारहाण करुन जीवे मारले.हेमंत कैलास काटे,सागर जगदिश काटे,रोहित जगदिश काटे,कैलास मुरलीधर काटे,हर्षद कैलास काटे या नराधमांनी त्याचा खुन करुन अंगावर थुंकुन जातीवाचक शिवीगाळ केली,यामुळे प्रकरणांमुळे संपुर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.या दोन्ही गुन्ह्याच्या निषेधार्थ येथील उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन खटला फास्ट ट्रॕक कोर्टात चालवण्यात यावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली.