अभियंत्या कडून महिलांना अपशब्द महागात पडणार
बारामती: शारदानगर कल्याणी कॉर्नर येथील महिला विषयी अपशब्द वापरल्या बदल सर्व महिलांनी एकत्र येत एमआयडीसी चे सहायक अभियंता संजय कुलकर्णी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करून गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.(गुरुवार 11 जून )
आदर्शनगर कल्याणी कॉर्नर येथे सातारा उपविभाग 2 येथे कार्यरत असलेले सहायक अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मालकीचा प्लॉट नं 144/3 आहे. हा प्लॉट विक्री करण्यासाठी प्रत्यन करताना स्थानिक नागरिकांनी “चांगल्या व्यक्तीला विका” असा सल्ला दिला त्या प्रमाणे स्थानिकांनी चांगले ग्राहक सुद्धा त्या प्लॉट साठी आणले होते. परंतु कुलकर्णी यांना वाढीव रक्कम प्लॉट विकताना मिळत असल्याने ते गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना विकण्याचा प्रत्यन करत होते.स्थानिक नागरिक त्यास विरोध करीत होते. त्यामुळे स्थानिक व कुलकर्णी यांच्या शाब्दिक वाद झाला व मोबाईल द्वारे कुलकर्णी हे स्थानिक रहिवासी बाळासाहेब जगताप याना आदर्शनगर कल्याणी कॉर्नर मधील कुटूंबीय व महिला बदल लज्जा उत्पन्न होईल व बदनामी होईल असे बोलले.या मुळे सर्व रहिवासी संतप्त होऊन सर्वांनी तालुका पोलीस स्टेशन ला कुलकर्णी यांची तक्रार करून गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात कुलकर्णी यांच्या सातारा कार्यालयात प्रतिक्रिया साठी संपर्क साधला असता ते बारामती लाच रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
“सुसंस्कृत कुटूंब गुण्या गोविदाने राहत असताना जास्त पैसे मिळत असल्याने गुंड व नालायक लोकांना प्लॉट विकून कल्याणी कॉर्नर मधील वातावरण बिघडवणे चा डाव हाणून पाडल्याने महिला भगिनी च्या विरोधात अपशब्द वापरल्याने कुलकर्णी यास अटक तर करावी परंतु त्यांच्या तोंडास काळे फासून गाढवा वरून धिंड काढली जाईल व उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रीय महिला आयोगा कडे तक्रार करणार असल्याचे ” स्थानिक महिलांनी सांगितले.
गुरुवारी 4 वाजता तालुका पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल गेली आहे व तक्रार चे निवेदन पोलीस हवालदार श्री लंगोटे यांनी स्वीकारले
संजय कुलकर्णी हे स्वतः एमआयडीसी कार्यालय बारामती मध्ये पूर्वी कार्यरत होते त्या वेळी शासकीय सेवेत असताना एमआयडीसी चे दोन प्लॉट कसे खरेदी केले या बाबत चौकशी साठी मुबई कार्यालय व
न्यायालईन लढा देणार
असल्याचे आदर्शनगर कल्याणी कॉर्नर मधील सर्व रहिवाशी यांनी सांगितले.
कुलकर्णी यांनी महिलांचा अपमान केल्याने त्याच्या तोंडास काळे फासून निषेध करणार असल्याचे नारी महिला मंच च्या महिला सदस्यांनी सांगितले.