उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा किल्ला (भूईकोट )

परंडा किल्ला
परंडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला.
हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगर च्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगर च्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली.काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्ल
कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात परिमंडा (परांडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब व तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.
हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी ‘मुलुख मैदान तोफ’ होती.विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली. यासोबतच किल्ल्यात अजदा पईकर नावाचीही तोफ आहे. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिह मंदिर तसेच एक मशिद आहे. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर आहे. .हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.
परंडा किल्ला – ऐतिहासिक पार्श्वभूमी : कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला. 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!