फलटण मध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर दमदाटी करून हुज्जत घालण पडलं महागात

फलटण – नंबर प्लेट नसल्याने मोटारसायकल आडवली म्हणून संबंधित पोलीस कर्मचारी याला दमदाटी देत शासकीय कामात अडथळा आणल्याने एका तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तो तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याला न्यायालयात दाखल केले असता त्याची थेट रवानगी जेल मध्ये करण्यात आली आहे.
या बाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातुन दिलेल्या माहितीनुसार रविवार दि.7 जून रोजी पोलीस वाहतूक नियमनाचे काम करीत असताना आपल्या मोटारसायकल वरून येत असलेल्या सागर रोहिदास जाधव, वय 30 वर्ष, राहणार गणेश शेरी गोविंद दूध डेरी जवळ,फलटण हा नाना पाटील चौक येथे आला या वेळी रविवार दि 7 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नाना पाटील चौक फलटण येथे फिर्यादी हे वाहतूक नियंत्रणाचे काम करीत असताना संबधित तरुण त्यांची लाल रंगाची अपाची गाडी नंबर प्लेट नसलेली घेऊन आल्याने त्यांना गाडीची कागदपत्रे व परवानाबाबत विचारणा केली या कारणावरून फिर्यादी पोलिस कर्मचारी यांना दमदाटी करून हुज्जत घालून ‘मी शिक्षा भोगून आलेला आरोपी आहे तू माझ्या गाडीला हात तरी लावून बघ’ असे म्हणाला ‘तू माझी गाडी सोडली नाही तर मी तुला बघून घेईल’ असे म्हणून तेथे पडलेली वीट हातात घेऊन फिर्यादी यांची अंगावर मारण्यासाठी धावून आला म्हणून सागर जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केला व धमकी दिली या प्रकरणी या तरुणांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान वरील आरोपीला जाग्यावरच पोलिसांकडून ताब्यात घेतले गेले. सदर आरोपी हा नशेमध्ये असल्याने त्याने यावेळी गोंधळ केला. सबधिता आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप पोमन यांनी दिली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!