कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद
बारामती : वार्तापत्र राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापन दीना निमित्त रक्तदान शिबीर चे आयोजन शारदा प्रागण येथील कार्यालयात करण्यात आले होते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
वर्धापन दिन दि. १० जुन रोजी असुन कोरोनाच्या परिस्थीत रक्तदान करून वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय
पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी २१ वर्षापुर्वी एक पुरोगामी विचार घेऊन पक्षाची स्थापना केली होती अशा पक्षाचा
वर्धापन दिन म्हणजे कार्यकर्त्यांना एक आनंदाची पर्वणी असते त्यांच्यात एक
उत्साहाचे वातावरण असते. लॉकडाऊन असल्यामुळे नागरीक घराबाहेर पडत
नाहीत त्यामुळे रक्तदान करणाऱ्यांचे
प्रमाण कमी झाल्यामुळे राज्यात रक्ताचा
तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजू
रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास
रक्ताची उपलब्धता होण्यास फार
अडचणी येत आहे. सध्याच्या कोरोना विषाणू
महामारीच्या कठीण काळात परिस्थीतीचे
गांभीर्य बघून राज्याचे
– अजितदादा पवार यांनी “एक हात मदतीचा”
देण्यासाठी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त
रक्तदान शिबीर आयोजित करून वर्धापन दिन
साजरा करण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या
कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले होते
त्याच अनुषंगाने बारामती शहर व
तालुका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने
– मंगळवार दि.०९/०६/२०२० रोजी स.९:००
वा. बारामती नगर परिषद शाळा शारदा प्रांगण,
बारामती येथे रक्तदानासारखे पवित्र काम करण्यासाठी सर्व कार्यकर्ते तसेच विविध संस्थेचे
आजी- माजी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.