फलटण : फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिपक मदने उपाध्यक्षपदी सुभाष सोनवलकर तर ग्रामीण पत्रकार संघाच्या सचिव पदी रोहन झांजुर्णे व खजिनदार व प्रसिद्धिप्रमुख सचिन निंबाळकर यांची निवड झाली.
फलटण येथील माळजाई मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीत फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. कोरोना व्हायरस पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळून या निवडी करण्यात आल्या आहेत.
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे
अध्यक्ष-दिपक मदने, उपाध्यक्ष- सुभाष सोनवलकर, सचिव – रोहन झांजुर्णे, खजिनदार व प्रसिद्धीप्रमुख सचिन निंबाळकर यांची निवड करण्यात आली..
यावेळी पुणे विभागीय पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीरंग पवार, सातारा जिल्हा अध्यक्ष विनायक शिंदे,जेष्ठ पत्रकार स.रा.मोहिते,सुरेश भोईटे, सूर्यकांत निंबाळकर, नानासाहेब मुळीक, तानाजी भंडलकर,अशोक सस्ते, संजय जामदार, निलेश सोनवलकर,वैभव गावडे, अजित निकमसह पदाधिकारी उपस्थित होते.