जिल्ह्यातील 47 नागरिकांना डिस्चार्ज ; आज सोडले घरी तर 252 जणांच्या घशातील नमुने पाठविले तपासणीला

 सातारा दि. 8 ( जि. मा. का ):   कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 18 व सह्याद्री हॉस्पीटल, कराड, येथील 10, कोरोना केअर सेंटर, खावली येथील 6  नागरिक, बेल एअर हॉस्पीटल, पाचगणी येथील 5 व मायणी मेडिकल कॉलेज येथील 8 असे एकूण 47 जणांना आज डिस्चार्ज  देण्यात आला.

यामध्ये कराड तालुक्यातील शिणोली स्टेशन येथील 36, 28, 34, 24 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 7 व 13 वर्षांच्या मुली, 60 वर्षीय पुरुष,म्हासोली येथील 12, 14 व 15 वर्षीय मुले, 70 व 30 वर्षीय पुरुष व 3 वर्षाचा बालक,  वानरवाडी येथील 40, 29 वर्षीय पुरुष व 17  वर्षीय युवक, 66 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष आणि दोन पुरुष,मलकापूर येथील 75 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 42 वर्षीय पुरुष,  बहुलेवाडी येथील 51 वर्षीय महिला, साकुर्डी येथील 27 वर्षीय पुरुष.

पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील 16 वर्षीय युवक, ताम्हीणे येथील 25 वर्षीय महिला, सदुवरपेवाडी येथील 4 वर्षाची मुलगी, गलमेवाडी येथील 12 वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे.

जावली तालुक्यातील केळघर   16 वर्षीय युवक

                सातारा तालुक्यातील खाडगाव येथील 22 व 28 वर्षीय महिला, शहापुरी येथील 29 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, धनावडेवाडी येथील 22 वर्षीय महिला, चिंचणेर लिंब येथील 52 वर्षीय पुरुष.

                खटाव तालुक्यातील शेळकेवाडी येथील 38 वर्षीय महिला, अंभेरी 22, 21, 32 वर्षीय पुरुष व 45 व 55 वर्षीय महिला, कलेढोण येथील 42 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला.

महाबळेश्वर तालुक्यातील देवळी येथील 28 वर्षीय महिला व 15 वर्षाचा मुलगा, पाचगणी येथील 53 वर्षीय पुरुष व 3 वर्ष 6 महिन्याचे बालक.

खंडाळा तालुक्यातील अडीच वर्षीय बालक व आसवली  येथील 40 वर्षीय पुरुष.

आत्तापर्यंत 364 नागरिकांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

*252 जणांच्या घशातील नमुने पाठविले तपासणीला *

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 29, शिरवळ येथील 20, कराड येथील 53, फलटण येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 37, वाई येथील 73, रायगाव येथील 7, मायणी येथील 1, बेल एअर, पाचगणी येथील 10 असे एकूण 252 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस., पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!