सातारा दि. 8 (जिमाका): सातारा नगर परिषद हद्दीमधील रविवार पेठ, स्वा. सैनिक नगर येथे कोरोना संक्रमीत रुग्ण आढळला होता. या अनुषंगाने हे क्षेत्र सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले होते. उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांना प्राप्त अधिकारानुसार नगरपालिका हद्दीतील रविवार पेठ, स्वा. सैनिक नगर, सातारा सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र शिथील केले याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी यांच्याकडील आदेशानुसार तसेच शासनाकडून प्राप्त होणारे कोरोना (कोविड-19) बाबतचे आदेश व दिशानिर्देश असतील ते सर्व त्यांचेवर बंधनकार राहतील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.