बारामती:बारामती एमआयडीसी येथील (मंगळवार दि.2 जून 2020) ग्रामपंचायत
वंजारवाडीच्या उपसरपंच पदी सौ.इंदुबाई सोमनाथ चौधर यांची
बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ किरण रणजित जगताप, ग्रामसेवक महेश लव्हाटे,पोलीस पाटील
पोपट चौधर, ग्रामपंचायत सदस्य सावित्रीबाई रोहिदास चौधर, शुभांगी
भागवत चौधर, मोहन सर्जेराव चौधर,बबन सावंत, विनोद दासा चौधर,
सागट त्रिंबक मालुसरे यांनी नवनियुक्त उपसरपंच यांचे अभिनंदन
केले. ही निवडणुक कोरोनाचे संकट असल्याकारणाने खबरदारी
म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शांततेत पार पाडण्यासाठी
नितीन सोमनाथ चौधर,अजित रोहिदास चौधर, भागवत चौधर,
काशिनाथ दराडे, रोहिदास चौधट, पिंटू सावंत, मारूती खोमणे, राहुल
शिरसट शरद चौधर,सागर दराडे,देवा चौधर,हरिदास चौधर,संतोष चौधर यांनी सहकार्य केले.”विकास कामाचा लौकिक कायम ठेवू व शासनाच्या विविध योजना सर्व सामान्य नागरिकांत पोहचवू “असे प्रतिपादन निवडीनंतर इंदूबाई चौधर यांनी सांगितले.उपस्तितांचे आभार नितीन चौधर यांनी मानले.
(छाया अनिल सावळेपाटील)