फलटण प्रतिनिधी – येथील मंगळवार पेठ येथे एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सहा जणांना 48 हजार रुपये 700 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 2 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ येथे टेंगुळ चौक जवळ पिंटू डावरे याचे बंद घरात शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात भोला बापू अहिवळे रा. मंगळवार पेठ फलटण, मुकेश शांताराम अहिवळे, किशोर घोलप(पूर्ण नाव माहिती नाही) विशाल शंकर अहिवळे सर्व राहणार मंगळवार पेठ फलटण संतोष फाळके(पूर्ण नाव माहिती नाही) राहणार मलठण व संतोष फाळके याचा मित्र यांना तीन पानी पत्याचे पानावर पैसे लावून खेळत असताना पोलिसांना आढळून आले या वरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना घटनास्थळावर मोबाईल, रोख रक्कम, पत्त्याची पाने असा एकूण 48,700 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर गुन्ह्याची फिर्याद फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सतीश पोपटराव दडस यांनी दिली असून वरील सहा आरोपीच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पो. ह. फरांदे हे करीत आहे.