को-हाळे मध्ये कोरोना रुग्णाची संख्या चार वर
बारामती:वार्ताहर बारामती तालुक्यातील को-हाळे येथे आज 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने बारामती मध्ये एकूण रुग्ण संख्या बावीस झाली आहे.
गावातील कोरोना पोसिटिव्ह असलेल्या कुटुंबातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे आता कोऱ्हाळेत कोरोना रुग्णांची संख्या आता चारवर जाऊन पोचली आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या बाबतीत आता कोऱ्हाळे पहिल्या नंबरवर गेले आहे.
त्या नव्वद वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या बारा लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी त्या रुग्णाच्या पत्नीला कोरोना झाला होता.
त्यानंतर त्याच्या कुटुंबातील जे सहा लोक पुण्याला गेले होते त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते मात्र चार जणांचे रिपोर्ट पेंडिंग होते. त्या चार पैकी दोघांचे कोरोना रिपोर्ट पोसिटिव्ह आले आहेत. त्या दोन्ही महिला आहेत. त्यामुळे आता कोऱ्हाळेत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या चार वर जाऊन पोचली आहे त्यामुळे आता बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुगांच्या बाबतीत कोऱ्हाळे अव्वल स्थानी आहे.