बारामती:वार्ताहर बारामती पोलिसांनी इंदापूर व बारामती तालुक्यातील 24 गुंड तडीपार केले आहेत.
सदर आरोपी हे खुन, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारीमारी, गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी या
गुन्हयातील असुन त्यांना तडीपार करणेबाबतचे प्रस्ताव हे श्री औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक बारामती शहर,पो.स्टे. , श्री आण्णासाहेब घोलप, बारामती तालुका पो.स्टे. व श्री दिलीप पवार, सहा. पोलीस निरीक्षक
वालचंदनगर पो.स्टे. यांनी मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांना सादर केले होते.
सदरचे प्रस्ताव हे अधिक चौकशीकामी श्री. नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी
बारामती विभाग यांचेकडे प्राप्त झाले असता त्यांनी सदरच्या प्रस्तावांबाबत शहानिशा व चौकशी करून नमुद
आरोपींना तडीपार करणेबाबतचे अहवाल मा. श्री संदिप पाटील पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांचेकडे सादर
असता मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सदर बाबत शहानिशा करून एकुण (२४) आरोपींना तडीपार
करणेबाबतचे आदेश दिलेले आहेत.
बारामती शहर पोलीस स्टेशन:- अंतर्गत अक्षय उर्फ आकाश बापू जाधव , रविंद्र उर्फ पप्पू तुकाराम
मदने, दोन्ही रा. मळद यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौड
तसेच अहमदनगर जिल्हयातील कर्जत व सोलापुर जिल्हातील माढा,
करमाळा व अकलुज या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.
बारामती तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत दिपक तानाजी चव्हाण, रा. माळेगाव बु., तुषार उर्फ जंब्या
अंबाजी खोमणे, रा माळेगांव, किरण शंकर खोमणे, रा. माळेगांव, राजन बाळासाहेब पैठणकर, रा. माळेगांव, सचिन विलास खरात, रा. माळेगांव , अमोल भारत जगताप, रा. माळेगांव , ऋषीकेश हनुमंत चव्हाण, रा माळेगाव , संग्राम राजेंद्र चव्हाण, रा
माळेगांव , राहूल बाळासाहेब जाधव, रा. माळेगांव ,मनोज
बाळासाहेब पाटोळे, रा शिरवली, ता. बारामती यांना पुणे जिल्हयातील
इंदापुर, बारामती, दौंड, पुरंदर तसेच सातारा जिल्हयातील फलटण व
सोलापुर जिल्हातील माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात
आले आहे.
वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील १) बबलू उर्फ सौरभ मनोहर पवार, रा. रणगाव, ता. इंदापुर २) प्रितम
सुरेश जाधव, ३) सचिन अर्जुन गोसावी ४) अनिकेत उर्फ बापू
शिवाजी रणमोडे ५) इन्नू सरहिम नशिद पठाण रा रणगाव ६) संदिप
रामभाऊ गोसावी रा रणगाव ७) महेश महादेव अर्जुन रा चिखली, ता.
इंदापुर ८) कुपदिप पोपट रक्टे, रा रणगाव ९) पिंटू उर्फ दिपक औदुंबर
उबाळे रा वालचंदनगर १०) जेतस शिवाजी जाधव रा कळंब ११)
नितीन हरिभाऊ भोसले रा लासुर्णे, १२) सचिन शिवाजी अर्जुन यांना
पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड तसेच सोलापुर जिल्हातील
माढा व माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.