कोरोना च्या पार्श्वभूमीवर मास्क,सॅनिटायझर कोर्टात हवे
फलटण टुडे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोर्ट कामकाज 8 जुलै पासून सुरू करण्यात येत आहे पण त्या साठी खास नियम तयार करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या दि. ३०/०५/२०२० च्या मार्गदर्शिकेप्रमाणे व महाराष्ट्र शासनाचे दि. ३१/०५/२०२० च्या ठरावाप्रमाणे दि. ८ जून २०२० पासुन पुण्यामध्ये, बंधनात राहुन आणि दक्षता घेऊन केवळ अर्जंट व मोजक्या कामकाजाकरिता कोर्ट चालु करण्यास मे. उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे.
कोर्ट कामकाज हे सकाळी १० ते १ व २.३० ते ५.३० या तीन – तीन तासांचे दोन शिफ्ट मध्ये केले जाईल. त्या करिता केवळ १५% स्टाफ* हजर राहील.
*कामांचे स्वरूप*
सर्व बेल अॅप्लिकेशन्स, ऑर्डर व जजमेंटसाठी असलेल्या केसेस, मनाई व तत्सम अर्ज, मुद्दे काढणे, अंतिम युक्तिवाद वा अर्जंट स्वरुपाची कामेच घेतली जातील. परंतु सदर कामेही शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्स वर करावीत ,असा आग्रह असेल. युक्तिवाद हा लेखी स्वरूपात देणे इष्ट ठरेल. साक्षीदाराची तपासणी, उलटतपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा कमिशनर नेमुन घेण्यास परवानगी असेल. मोजक्या प्रमाणात ही कामे घेतली जातील.
*कामे करण्याची पध्दत*
सदर कामकाजांचा बोर्ड बनवून तो एक दिवस आधी बार असोशिएशन कडे देण्यात येईल. कोणी पार्टी गैरहजर असल्यास न्यायाधीश ही शक्यतो अॅडव्हर्स ऑर्डर्स व एकतर्फी आदेश करणे तसेच, आरोपी वा साक्षीदारास वॉरंट काढणे टाळतील. केसेस दाखल करण्याकरिता एन्ट्री गेटजवळ तळ मजल्यावर विशिष्ट वेळेत सोय केली जाईल. त्यासाठी टोकन दिले जाईल आणि दाखल केसेस २४ ते ३६ तासांसाठी बाजुला व तुटक ठेवल्या जातील.
*दक्षता*
कोर्ट हॉल मध्ये वकील व स्वत: केस चालविणाऱ्या पक्षकारांनाच प्रवेश दिला जाईल. पुकारा होईपर्यत कोणीही कोर्ट हॉल मध्ये वा व्हरांड्यात न थांबता बाहेर तुटक थांबावे. मास्क लावल्याशिवाय व हात सॅनिटाईज केल्याशिवाय कोर्ट हॉल मध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही. वकिलांनी ज्युनियर वा पक्षकारांना सोबत घेऊन कामकाज करु नये. काम नसणाऱ्यांना कोर्ट हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही.
*बंधने*
वकिलांच्या बार रूम बंद ठेवल्या जातील. संबंधित अॅथाॅरिटीजच्या परवानगी शिवाय कॅन्टिन उघडलेल्या जाणार नाहीत. कोर्ट आवारात प्रवेश करण्यासठी केवळ एकच गेट असेल आणि हात सॅनिटाईज केल्याशिवाय व मास्क घातल्याशिवाय, गेट मधुन प्रवेश मिळणार नाही. ज्यांना ताप ,सर्दी, खोकला, घसादुखी असेल, त्यांनी कोर्टात येऊ नये . गेट वर थर्मल स्क्रीनिंग व टेम्परेचर गन द्वारे तपासणी केली जाईल. आरोग्य सेतु अॅप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करणे आवश्यक असेल. वकील व पक्षकारांना गेटवर ,कोर्टात कामकाज असल्याशिवाय सोडले जाणार नाही.
*कोव्हीड – १९* च्या प्रादुर्भावाच्या कठीण काळात,सर्व वकिलांनी व कोर्ट कामकाज निमित्त येणाऱ्या प्रत्येकांनी नियमाचे पालन करण्याचे आव्हान बार असोसिएशन च्या वतीने करण्यात आले आहे.