सिद्धेश्वर नींबोडी व कोरहाळे येथे आज रुग्ण सापडले
बारामती : बारामती तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढत आहे
तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील दोघांना करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी एकास आज
कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. याखेरीज तालुक्यातील कोहाळे बुद्रुक भागातील एका ९० वर्षीय वृध्दासकोरोनाची लागण झाली. त्यामुळे बारामतीत आज नव्याने दोन कोरोनाचे
रुग्ण वाढले. सिध्देश्वर निंबोडीत पोलिस कर्मचाऱ्याच्या
संपर्कात आलेल्या कुटुंबातील दोघा जणांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून याच
कुटुंबातील आणखी दोघांवरही उपचार सुरू केले असतानाच त्या कुटुंबाच्या
संपर्कातील काही जणांची कोरोनाची चाचणी केल्यानंतर या कुटुंबातील २०
वर्षीय नातवाला नव्यानेकोरोनाची
लागण झाल्याचे तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.
दुसरीकडे आज तालुक्यातील कोहाळे बुद्रूक येथील ९० वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल
आला. हा व्यक्ती कोठेही बाहेर गेल्याची नोंद नाही, मात्र या ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा भाजीपाल्याची वाहतूक करतो.
त्याच्या वाहनाचा प्रवास आजूबाजूला झाला असल्याने प्रशासन सतर्क झाले
आहे. आजच्या दोन रुग्णांमुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा
वाढता प्रभावही स्पष्ट झाला आहे.
बारामती करानो सावधान व काळजी घ्या शासनाने लॉक डाऊन मध्ये सूट दिली आहे कोरोना ने सूट दिली नाही.