अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई..

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील कुरवली बु येथील बाणगंगा धरणाच्या मध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फलटण तालुक्यामधील कुरवली बु. या ठिकाणी बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या वाळू उपसावर सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. यात एकूण १४ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक १ जून सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्नी.सर्जेराव पाटील यांनी कुरवली खु.ता.फलटण गावाच्या हद्दीत असलेल्या बाणगंगा धरणामध्ये अवैध वाळू उपसा स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी पथक तयार करुन कारवाई करणेच्या आदेश दिला होता. कुरवली बु. ता.फलटण जि.सातारा येथे गेले त्यानंतर फलटण ते उपळवे जाणा-या रोडवर बाणगंगा हॉटेल च्या बाजूला गाडी
उभी करुन बाणगंगा धरणाचे पात्रात मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पायी चालत जावून अचानक १२ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता, तेथे काही लोक व सहा ट्रक्टर व एक टेम्पो होते.
सदरच्या धरणामध्ये मजुरांच्या कडून वाळू उपसा करुन व तो भरण्याचे चालले होते. आम्ही तेथे पोहचताच मजुर धरणामध्ये आजुबाजुला पळून गेले. तेथे असलेले ट्रक्टर व टेम्पो चालक यांना आमच्या व पंचाच्या ओळख करुन देवून जागेवरुन न हालण्याच्या सुचना देवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता, त्यांनी आपली नावे १) अनिल बबन पवार वय ४३ रा.जिंती नाका, २) अक्षय दादासो झेंडे वय २२ वर्षे रा.वाठार निंबाळकर,३) विनोद रामभाऊ मदने वय २९ वर्षे रा.धुळदेव,४) वैभव संजय निंबाळकर वय २१ वर्ष रा.विंचुर्णी ५) मालोजी उर्फ पप्पु बाळु जाधव वय २९ वर्षे रा.जाधववाडी ६) नवनाथ ज्ञानेश्वर भंडलकर वय २१ वर्षे रा.तावडी,८) सुखदेव हिरालाल जाधव वय ४२ वर्षे रा.जिंती नाका फलटण अशी असल्याचे सांगितले. त्यांना सदर वाहनांचे मालकाबाबत विचारपुस करता त्यांनी आम्ही स्वत:च असुन, त्यापैकी अक्षय झेंडे याने सांगितले की, माझे मालक ८) तानाजी बबन जाधव रा.धुळदेव ता.फलटण असे असल्याचे सांगितले. या कारवाईत एकूण किंमत १४ लाख २३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्व मुद्देमालावर मा.सपोनि श्री.साबळे यांनी त्यांच्या व पंचाच्या सह्या घेऊन वाहने जमा केली आहेत.वरील सर्व आरोपींच्या वरती ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभाग व पोलिस विभागावर कारवाईची मागणी
स्थानिक महसूल विभाग व स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी फलटण तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर आर्थिक हेतूने कारवाई करत असल्याची गोष्ट आजच्या कारवाईतून स्पष्ट होत असून फलटण तालुक्यात अनेक दिवसांपासून अवैध वाळूचा उपसा सुरू असून तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार उपविभागीय अधिकारी तसेच अनेक ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची बाब या कारवाईने स्पष्ट होत आहे या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ स्थानिक महसूल विभाग व स्थानिक पोलिस कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून फलटण तालुक्यातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई सुरूच ठेवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!