आसू – मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन चालू आहे याच लॉकडाऊनचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहे याचाच विपरीत परिणाम मानवी जीवनावर जास्त होऊ नये म्हणून बोरगाव येथील मोहनराव पतंगराव पाटील विद्यालयाने कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर आधारित ऑनलाइन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते
या निबंध लेखन स्पर्धेत आसू येथील दिपाली भीमराव शिरतोडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला दिपलीने विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात बी.कॉम पूर्ण केले असून ती सध्या शारदाबाई पवार महिला आर्टस,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शारदानगर – बारामती याठिकाणी एम.कॉम चे शिक्षण घेत आहे. दीपालीने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवल्यामुळे कॉलेज मधील प्राध्यापकांनी तसेच नागरिकांनी विविध स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव केला व फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर , धिरेंद्रराजे खर्डेकर व आसू ग्रामपंचायत सरपंच महादेवराव सकुंडे यांनी व आसू- पवारवाडी ग्रामस्थांनी दिपालीचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.