सातारा दि. 29 (जिमाका) : मौजे कामेरी येथे कृषी विभागाच्यावतीने सोयाबीन शेतीशाळा संपन्न झाली. या शाळेमध्ये शेतकऱ्यांना बियाणे निवड, उगवण क्षमता चाचणी, बिजप्रक्रीया, खते व तणनियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जमिनीचा पोत सुधारउयासाठी सेंद्रीय खतांचा वापर यामध्ये शेणखत, गांडुळ, खत, ताग, धैंचा, कोंबडी खत, पेंडी, पाचटाचे खत याबाबत देण्यात आली. अनुदानावर बांधावर फळबाग लागवड, गांडूळ खत, नाडेप बांधणी, हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे व आंबवण सापळे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रगतशील शेतकरी अभिजीव घाडगे यांच्या गांडूळ खत युनिट बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र साबळे यांनीही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.