जिल्ह्यात 26 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; केळघर (तेटली) येथील रुग्णाच्या मृत्यु पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

सातारा दि. 28  (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 26 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जावळी तालुक्यातील केळघर ( तेटली ) येथील मुंबई वरून आलेल्या चार वर्षे आजारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू 26 मे रोजी झाला होता, मृत्यू पश्चात त्याचे स्त्राव तपासणीसाठी घेतले होते ते आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या बाधित रुग्णांमध्ये पाटण तालुक्यातील सळवे येथील 1, सदूवरपेवाडी येथील 1, करपेवाडी येथील  1,  गलमेवाडी येथील 1,  घनबी येथील 1.
 कराड तालुक्यातील म्हासोली येथील 8, वानरवाडी येथील3, भरेवाडी येथील 1.
फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 1.
वाई तालुक्यातील जांभळी येथील 6
जावळी तालुक्यातील आपटी येथील1 , व केळघर (तेटली )येथील 1 (मृत)
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील  एकूण संख्या 452, उपचार घेत असलेले 302, कोरोना मुक्त 134 आणि मृत्यू 16 झाले आहेत.
जाहिराती साठी संपर्क –
प्रवीण काकडे सर -992-293-1066
राहुल पवार – 966-582-4007

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!