फलटण : जावली ता फलटण येथील पत्रकार तथा सा.नमस्ते फलटण चे उपसंपादक राजकुमार आप्पासो गोफणे यांची शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे गेली २० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्यासाठी राजकुमार गोफणे कार्यरत आहेत सामाजिक ,शैक्षणिक कार्यात ही सहभागी होवून सतत कार्यरत असतात.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे आगामी काळात तळागाळातील सर्व सामान्य लोकांना घटक मानून यापुढेही कार्यरत रहाणार असल्याचे राजकुमार गोफणे यांनी सांगितले .
या निवडी बद्दल राजकुमार गोफणे यांचे विविध स्तरामधुन अभिनंदन होत आहे.