मास्क,सॅनिटायझर,हॅन्डग्लोज,
निर्जंतुकिकरण नाही.
कोविड -19 विशेष भत्ता देण्याची कामगार संघटना ची मागणी.
बारामती: उद्योजक व कंपन्या जगल्या पाहिजेत,रोजगार वाढला पाहिजे,नवीन कंपन्या राज्यात आल्या पाहिजेत परंतु या कंपन्यांना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) च्या सेवेमधील कंत्राटी कामगारांची अवस्था दयनीय झाली असून त्यांना ‘कोरोना ‘ ची लागण झाल्यास कोणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे.तर एमआयडीसी प्रशासन आमची जवाबदारी नसल्याचे सांगून जवाबदारी झटकत आहे.
एम आय डि सी मधील कंत्राटी कामगारांची दयनीय अवस्था लॉकडाऊन च्या दरम्यान झाली आहे झाली असून राज्यातील विविध भागातील पुणे ,कोकण, औरंगाबाद, नागपूर, या चार विभागा मध्ये ३४७ कामगार गेली २७ वषेँ आत्यावशक पाणी पुरवठा केंद्र चालवत असुन त्याना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत भविष्य निर्वाह निधी मिळत नाही लॉकडाऊन च्या काळात विशेष भत्ता नाही , अत्यल्प वेतन आहे
राज्यात या सर्व विभागामध्ये ८० टक्के कंत्राटी पद्धतीने काम करणारे लोक वाँटर सप्लाय चालवीत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना मास्क, सॅनिटायझर, दिले जात नाही किंवा कामावर असताना वापरत असलेली प्रशासनाची व कामगारांची वाहने निर्जंतुक केली जात नाही .
कामगार आपला जीव धोक्यात घालून वाँटर सप्लाय चालवीत आहेत त्यांना कोरोना विरोधात कोणताही प्रकारचे संरक्षण नाही त्यामुळे एमआयडीसी प्रशासन ने कोरोना चा कामगारांना संसर्ग होऊ नये या साठी सर्व आत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात अशी मागणी एमआयडीसी एकता कर्मचारी संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे. ” बारामती विभागा साठी मास्क,सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे तर वाहने निर्जंतुक करण्यासाठी सहकार्य केल्याचे” बारामती चे कार्यकारी अभियंता एस आर जोशी यांनी सांगितले.
चौकट राज्यातील कामगारांना मास्क,सॅनिटायझर पूरविणे बाबत विभागांना आदेश दिले असून कोविड19 विशेष भत्ता,भविष्य निर्वाह निधी,सेवेत कायम करणे आदी बाबत उद्योगमंत्री यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार असल्याचे एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी(मुंबई ) यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
चौकट:
राज्यात कामगारांना वॉटर सप्लाय प्लांट वर पाण्या समवेत काम करावे लागते त्यामुळे कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आतवश्यक साधने देणे अत्यंत गरजेचे आहे तर उद्योग सुरू करताना पाणी पुरविणे हे काम तेही
लॉकडाऊन च्या कठीण परिस्थितीत कामगारांनी केल्याने विषेश भत्ता द्यावा व विविध मागण्यांसाठी उदयोग मंत्री सुभाष देसाई व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे एमआयडीसी एकता कर्मचारी संघटना चे राज्य अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांनी सांगितले.
Aho kahi companey cha pagar pan nahi milat
Pare khanadala midc Ariya madhil companey