श्रमिक रेल्वेद्वारे 25 मे अखेर 16 हजार 107 परप्रांतीय स्वगृही रवाना

सातारा दि. 26 ( जि. मा. का ): कोरोच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील 16 हजार 107 परप्रांतीय  मजुरांना 13 श्रमिक रेल्वे गाड्यांमधून त्यांच्या मुळ राज्यात सोडण्यात आले आहे.  परप्रांतीय मजुरांना आपल्या स्वगृही जाता यावे यासाठी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.
सातारा रेल्वे स्टेशन येथून मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी 12 मे  ते 25 मे अखेर श्रमिक रेल्वे व त्यामधून गेलेल्या मजुरांची संख्या पुढीलप्रमाणे. मध्यप्रादेश 1  रेल्वे-मजूर संख्या 1305, राजस्थान रेलवे- 1 मजूर संख्या 873, उत्तरप्रदेश 7 रेल्वे- 8993 मजुर संख्या, छत्तीसगड 1 रेल्वे-मजुर  संख्या 1012, बिहार 2 रेल्वे मजुर संख्या 2722 आणि झारखंड 1 रेल्वे आणि 1200 मजुर असे एकूण 16 हजार 107 परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.
या कामी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नोडल ऑफीसर म्हणून उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांची नियुक्ती केली होती. त्यांच्याबरोबर उप वनसंरक्षक धर्मवीर साल्वीथल आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांचेही  मोलाचे सहकार्य लाभले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!