बारामती:
रुई मध्ये एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यां मध्ये कार्यरत असणारी मजूर व परप्रांतीय यांची संख्या मोठी आहे एमआयडीसी मधील कंपन्या हळूहळू सुरू झाल्या परंतु या मजुरांना अद्याप जीवनावश्यक वस्तू ची गरज होती त्यामुळे स्थानिक नगरसेविका सुरेखा चौधर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे पाठपुरावा केल्यानंतर माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांच्या मार्फत मंगळवार दि.26 मे रोजी शंभर जीवनावश्यक किट रुई गावात व गेनबा नगर परिसरात वाटप करण्यात आले या प्रसंगी स्थानिक नगरसेविका सुरेखा चौधर,पांडुरंग चौधर, गोरख चौधर, आबा चौधर, गणेश चौधर,
अजित चौधर, नितिन पानसरे, महेश चौधर ,विशाल जगताप,
संदीप चौधर, गुलाब चौधर आदी मान्यवर उपस्तीत होते.या पूर्वी टेक्स्टाईल पार्क च्या माध्यमातून 350 कुटूंबियांना किट वाटप करण्यात आले होते .
फोटो : किट वाटप करताना नगरसेविका सुरेखा चौधर,पांडुरंग चौधर व इतर