सातारा जिल्ह्यात नवे 31 कोरोना बाधित;पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही त्यात समावेश

सातारा दि. 23 (जिमाका): सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 31 जण कोरोना ( कोविड 19 ) बाधित असून यात  मुंबई येथून आलेली आणि पाचगणी येथे मृत्यू झालेल्या  70 वर्षीय महिलेचाही समावेश असून 80 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीवर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील निकट सहवासित 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय मुलगा, वय 11, 34 19 वर्षीय 3 महिला, शेणाली येथील मुंबईवरुन आलेले 60 व 50 वर्षीय 2 पुरुष व 35 वर्षीय महिला.

जावली तालुक्यातील गवडी येथील निकटवासित 32 वर्षीय पुरुष, ठाणे येथून आलेले कसबे बामणोली येथील 23 व 14 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली सायगाव येथील 58 वर्षीय महिला.

खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 29 वर्षीय महिला, 10 वर्षाचे बालक व  50 वर्षीय पुरुष, अंधोरी येथील सारीचा 43 वर्षीय पुरुष.

महाबळेश्वर तालुक्यातील मुंबई येथून आलेला पाचगणी येथील 70 वर्षीय महिला (मृत).

वाई तालुक्यातील मुंबई येथून आलेली वाई येथील 48 वर्षीय महिला, मुंबई येथुन आलेला  देगाव येथील 60 वर्षीय पुरुष.

सातारा तालुक्यातील चिंचणेर-लिंब येथील निकटसहवासित 43 वर्षीय पुरुष, कुस खुर्द येथील 76 व 43 वर्षीय 2 महिला व 17 वर्षीय युवती.

खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 28 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिला, मांजरवाडी येथील  47 वर्षीय महिला,  मुंबई येथून आलेला  चिंचणी येथील 21 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली खतगूण येथील 20 वर्षीय महिला.

कोरेगाव तालुक्यातील मुंबई येथून आलेला वाघोली येथील सारीचा 53 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय  महिला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!