कृष्णा हॉस्पिटल मधील चार जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

सातारा दि. 20 (जिमाका) :  कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असलेले म्हासोली ता. कराड येथील 40 वर्षीय निकट सहवासित पुरुष, मुंबई येथून प्रवास करुन आलेला  इंदोली ता. कराड येथील एक 39 वर्षीय पुरुष व ठाणे येथून प्रवास करुन आलेले भारेवाडी ता. कराड येथील पती – पत्नी वय वर्षे 52 व 43 अशा एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

      जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 170 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 3 रुग्ण आहेत.

 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!