दारू पिण्यास पैसे न दिल्याने बरड येथे एकाचा खून

आसू :- बरड येथे महादेव मंदीर परिसरात किरकोळ वादातून एकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार, बाळू नामदेव गावडे वय 54 रा. बरड ता. फलटण असे मृत व्यक्तीचे नाव असून दि १८ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास बरड येथील पालखी तळालगत असलेल्या महादेव मंदिराच्या सभामंडपात गावातीलच संशयित आरोपी सागर पोपट लोंढे वय ३६ व सावकार नामदेव लोंढे दोघे राहणार बरड ता. फलटण यांनी दारू पिण्यास पैसे का देत नाही या किरकोळ वादातून बाळू नामदेव गावडे यांची फारशी तसेच विटा व काठी डोक्यात मारून हत्या केली. यानंतर दोघे संशयित आरोपी पळून गेले. पोलीसांनी दोन्ही संशयित आरोपीस अटक केली आहे. बाळू गावडे यांची हत्या झाल्याची माहिती बरड गावात पसरताच काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना समजूत काढुन शांत राहण्याचे आवाहन केले यानंतर पोलीसांनी पंचनामा करूण मृतदेह फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. अशोक शंकर गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बरड गावात पोलीस दुरक्षेत्र ठाणे असून या ज्या ठिकाणी खुनाची घटना घडली या पालखी तळाच्या व महादेव मंदिर परिसरात बरड गावातील महिला व वृद्ध फिरण्यासाठी येत असतात याचं मंदिर परिसरात व्यसनाधीन लोक सतत बसलेले असतात मंदिर परिसर व्यसनध लोकांचा अड्डा बनला होता मंदिर परिसरात बसणाऱ्या व्यसनाधीन लोकवरती व गावात मिळणाऱ्या अनधिकृत दारू बद्दल अनेक वेळा ग्रामस्थांनी कारवाई करण्याची मागणी पोलीसांकडे केली होती. परंतु याकडे पोलीसांनी दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!