सातारा दि. 18 (जिमाका) : आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या 232 जणांचे आणि बनपुरी येथे क्वारंटाईन कक्षामध्ये असलेल्या मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 43 वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने तीचाही कोविड संशयित म्हणून नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 20, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 105, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 67, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 11, ग्रामीण रुणालय कोरेगांव येथे 17 व ग्रामीण रुणालय वाई येथे 12 असे एकूण 232 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.