तुंग किल्ला-पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला

तुंग किल्ला-
११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता. 
या गडावर जाणार्‍या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणत: ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.
गडावर जाण्यासाठी ब्राम्हणोली – केवरे
अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोना पेठेत उतरावे आणि काले कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लॉंच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.
पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.
या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.
गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोडाच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत थोडाच अंतरावर हनुमान मंदिर लागते.पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्याशिवाय इतर ऋतूत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकारे एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.
गडावर राहण्याची ठिकाणे तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे मंदिर आहे यात २ जणांना राहता येते.
पायथ्याला जेवणाची सोय उपलब्ध आहे. गडावर कोणत्याही प्रकारची दुकाने किंवा जेवणाची सोय नाही.
मंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे. पावसाळ्यात गडावरील टाक्यात पाणी उपलब्ध असते.
गडावर जाण्याच्या ब्राम्हणोली-केवरे  तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लॉंच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.
तुंगवाडीच्या फाटा मार्गेः जर लॉंच ची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाटावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहचतो.
गडावर जाण्यासाठी कमीत कमी 30 मिनिटे ते 1 तास लागतो. आपण बसून व थांबून 1:15 मी।.पोहचू शकता

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!