बारामती कोर्टात वकील पोलीस यांच्यात तुंबळ मारामारी

क्राईम

बारामती:वार्ताहर  पोलीस व वकील यांच्यात आज न्याय मंदिर या इमारत समोर झालेल्या हाणामारीत पोलीस व वकील जखमी झाले आहेत.
वकिलांवरील अन्याय सहन केला जाणार नाही,दोषी पोलिसांवर
कारवाई केल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका  बारामती वकील संघटना यांनी घेतली आहे.
बारामतीत काल संध्याकाळी एका वकिलासह नाना सातव
आणि अन्य कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
दाखल झाला होता. त्याच्या न्यायालयीन कामासाठी त्यांना कोर्टात नेहत असताना 
त्यावेळी एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ शूटिंग करत होता.त्याला
वकिलांनी अटकाव केला.कोर्टाच्या आवारात बेकायदा शूटिंग करू
नका असे सांगितले, यावरून पोलीस वकील यांच्यात बाचाबाची झाली   त्यानंतर उपविभगायीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर
तेथे हजर झाले. त्यानंतर वकील राजेंद्र काळे, नितीन भामे व इतर
वकिलांची शिरगावकर यांच्याबरोबर शिवीगाळ झाली.
झालेल्या बाचाबाची नंतर त्याच पर्यावसन हाणामारी मध्ये झालं.
आणि दोन्ही बाजूने तुफान मारामारी झाली.पोलिसांनी काही
वकिलांना ताब्यात घेतले असून अद्याप त्यांच्यावर काय कारवाई झाली
हे समजले नाही. अशी माहिती समोर येत आहे.
मात्र या प्रकारानंतर वकील संघटना प्रचंड आक्रमक झाल्या
असून पोलीस कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला
आहे.दरम्यान डीवायएसपी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याच वकील संघटना यांचेकडून बोलले जात आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!