बारामती:वार्ताहर बारामती एमआयडीसी मधील आय एस एम टी कंपनीच्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर व उन्हाळयाची तीव्रता वाढत असताना पोलीस कर्मचारी, अधिकारी व विविध कामासाठी येणारे नागरिक यांच्या साठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर वो युनिट व कुलर बारामती तालुका पोलीस स्टेशन ला देण्यात आला. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर भापकर यांच्या मार्गदर्शनखाली आता पर्यंत विविध क्षेत्रात कोरोना साठी मदत केली आहे.सोमवार दि.11 मे रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपये चा निधी जमवून कोरोना साठी मदत करताना पोलीसा च्या सूचनेनुसार सदर मदत देण्यात आली . या प्रसंगी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप,पोलीस हवालदार अनिल ओमासे ,भानुदास बंडगर व कंपनीचे अधिकारी विशाल शिंदे आदी मान्यवर उपस्तीत होते.” कोरोना च्या लढाईतील ‘खरे योद्धे’ पोलीस व आरोग्य सेवक आहेत त्यांचा सन्मान व त्याच्या कार्यास सलाम म्हणून सदर मदत करून सामाजिक काम करीत असल्याचे किशोर भापकर यांनी सांगितले.