कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईधाम प्रतिष्ठान च्या वतीने पोलिसांना मोसंबी वाटप

बारामती:वार्ताहर शनिवार  दिनांक 9  मे  रोजी बारामती शहरातील  साईधाम प्रतिष्ठान  यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर  बारामती शहर पोलीस स्टेशन व  बारामती ग्रामीण पोलिस स्टेशन आणि  बंदोबस्तासाठी इतर जिल्ह्यातून  असलेले सर्व पोलिस कर्मचारी  यांना मोसंबीचे मोफत वाटप केले. या वाटप प्रसंगी साईधाम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संगीता सूर्यकांत घाडगे व साईधाम प्रतिष्ठानचे सचिव श्री  सूर्यकांत नागनाथ घाडगे व साईधाम प्रतिष्ठानचे अन्य सदस्य उपस्थित होते या कोरोना पार्श्वभूमीवर रस्त्यावर सकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत बंदोवस्त करणे आणि रात्री तालुक्याच्या व जिल्ह्याच्या सीमेवर बंदोबस्त करत असताना आपल्या कुटूंबाची पर्वा न करता दिवस रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कोरोना संसर्ग होऊ नये या साठी जण जागृती करणारे पोलीस व आरोग्य सेवक खरे कोरोना च्या लढाईतील ” योद्धे” आहेत म्हणून त्यांच्या प्रति आदर म्हणून  मोसंबी व्यवसायातील काही वाटा विविध जातीच्या  मोसंबी  देऊन घाडगे परिवार व साईधाम प्रतिष्ठान च्या वतीने आदर  व्यक्त करत आहोत असे तात्या घाडगे यांनी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!