बारामती: देसाई इस्टेट येथील श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने कोरोना विरोधात लॉकडाऊन च्या काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी,कर्मचारी ,आरोग्य सेवक यांचा सन्मान करण्यात आला व देसाई इस्टेट मधील नागरिकांना घरोघरी सॅनिटायझर वाटप आणि मास्क चे वाटप करण्यात आले.”श्री गणेश तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे” प्रांताधिकारी दादासाहेब निकम यांनी सांगितले. “मंडळाचे कोरोना सोल्जर्स म्हतपूर्ण कामगिरी लॉक डाऊन च्या काळात करीत असल्याचे” पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.”नगरपालिका प्रशासन मंडळाच्या पाठीशी नेहमी उभी असल्याचे” नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले. “देसाई इस्टेट सर्वत्तम प्रभाग कोरोनाच्या लढाईत आघाडीवर आहे”असे शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी सांगितले.
“देसाई इस्टेट मधील गरजू नागरिकांना धान्य वाटप,किराणा वाटप,भाजीपाला वाटप व आज योध्याचा सन्मान आणि नागरिकांना मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करून सामाजिक भान जपले आहे व या पुढेही करीत राहू “असे प्रास्तविक मध्ये स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले.
या वेळी जळोची चे माजी सरपंच छगन आटोळे,न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे, मंडळाचे अध्य अनिल खंडाळे, महिला अध्यक्षा सौ अनिता घुले,राहुल वायसे,महेश कोडलिंगे,सुशील जगताप,
मुकुंद खळदकर,धनंजय आटोळे,अभिजित गदादे,ओंकार रणदिवे,अमोल खंडाळे,रोहित जाधव,जावेद शेख,नितीन जाधव,संग्राम खंडागळे,अरुण शिंदे,बापू आटोळे,तेजस देसाई,सचिन नवसारे,धीरज बोरावके,निलेश पवार,सुरज शिंदे,साहिल शेख,यश बामणे,संजय गायकवाड,शाहरुख शेख,तानाजी कदम,संभाजी कदम,दीपक गायकवाड,ललित गावडे,सुरज बोरावके,सतीश कोडलिंगे,बाळासो आटोळे,गणेश माने,योगेश खत्री, शिवाजी आटोळे,गणेश बनकर,शेखर बनकर,क्ययूम शेख,प्रतीक बहिरट,शुभम लंगोटे, गणेश आटोळे,स्वप्नील क्षीरसागर,किशोर रसाळ,शुभम जोशी,वीरेंद्र जगताप,कुणाल जगताप,कुणाल पाटील,अन्सार शेख,संतोष जाधव,कुणाल कोथमिरे,चिंटू सोनवणे, विशाल शिंदे,सत्यवान वायाळ आदी उपस्तीत होते. या प्रसंगी कोरोना च्या विरोधातील उत्कृष्ट योद्धे म्हणून आरोग्य अधिकारी सुभाष नारखेडे,राजेंद्र सोनवणे,ज्ञानदेव रासकर,गणेश शिंदे,किशोर जोशी,अंजनगाव चे माजी सरपंच बाळासो वायसे, संदीप किर्वे, निलेश अवचरे आदी चा सत्कार करण्यात आला. श्री गणेश तरुण मंडळ च्या वतीने आठशे कुटूंबियांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले.