जीवधन- जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय!
शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय. शहाजीराजांनि  निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले.
गडाचा दरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे.
पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला “कोठी” म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते.
आयताकार असणार्‍या या गडाच्या टोकाला सुमारे २००० फूट उंचीचा “वानरलिंगी” ऊर्फ खडा पारशी नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
जुन्नर – घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा.
 गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची  ,पाण्याची सोय जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.
गडावर चढण्यासाठी लागणारा वेळ हा जुन्नर  घाटघर मार्गे  अंदाजे २ तास.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!