उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ज्या शेतकर्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व बँकेशी बोलणे सुरु आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाहीत. कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. 25 हजार मेट्रिक टन ज्वारी आणि 15 हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.